ग्रंथसेतु कसे वापरावे

१. ग्रंथ पाठवा

'माझे ग्रंथ' मध्ये स्कॅन केलेली PDF निवडा (कितीही मोठी — मोठी फाइल तुकड्यांनी जाते) किंवा फोटोंचा .zip. पाने फोटो काढलेली असतील तर आधी तयारी › चित्र तयारी उघडा: दोन पानांचा फोटो विभागला जातो, तिरकी पाने सरळ होतात, आडवी पाने फिरतात, कोरी व दुहेरी पाने बाजूला ठेवली जातात — आणि Undo ने सगळे परत येते.

२. package, पद्धत आणि पाने निवडा

सामान्य — आधुनिक स्वच्छ छपाई; प्रो — जुनी छपाई, प्राकृत/संस्कृत, तळटिपा, गणित; बिझनेस — हस्तलिखित व अतिशय कठीण प्रती. स्टँडर्ड स्वस्त, २४ तासांत परत; एक्सप्रेस महाग, लवकर परत. खात्री नसेल तर आधी काही पानांचा सशुल्क नमुना करून पाहा. पाठवण्यापूर्वी GST सह किंमत दिसते.

३. तुमचे wallet

आधी recharge करा (किमान रक्कम Wallet पानावर दिसते). ग्रंथ पाठवल्यावर सर्वाधिक अंदाजाची रक्कम राखली जाते; काम पूर्ण झाल्यावर फक्त प्रत्यक्ष वाचलेल्या पानांचे पैसे लागतात, बाकी परत येतात. ग्रंथ थांबवला? फक्त वाचलेल्या पानांचे पैसे.

४. तुमची Word फाइल, तुमच्या पद्धतीने

Word settings: पानाचा आकार व समास, परिच्छेद (font, आकार, अंतर), तळटिपा, पान क्रमांक, प्रत्येक भाषेसाठी style, तुमच्या नमुना Word फाइलवरून styles. ग्रंथ वाचून झाल्यावरही बदला — Word फाइल पुन्हा, मोफत बनते.

५. मुद्रितशोधन

मुद्रितशोधन › browser मध्ये proofreading — प्रत्येक स्कॅन शेजारी त्याचा मजकूर. शंकास्पद शब्दांखाली क्लिक करता येतील अशा सूचना; 'पुढचा शंकास्पद शब्द' त्यांतून क्रमाने नेतो. 'शोधा व बदला' संपूर्ण ग्रंथावर चालते. किंवा आमच्या टीमकडून मुद्रितशोधन करून घ्या (प्रति पान दर, मागवण्यापूर्वी दिसतो).

६. इतर फाइली

Export › फाइली: HTML, Markdown, TEI व ALTO XML, searchable PDF, छपाईसाठी PDF — मोफत, आणि 'लक्षात ठेवा' निवडल्यास प्रत्येक ग्रंथासोबत आपोआप. सशुल्क जादा सेवा: साधा मजकूर, अचूक searchable PDF, भाषांतर.

७. फाइली किती दिवस ठेवल्या जातात

तुमची PDF व Word फाइली प्रत्येक ग्रंथावर दाखवलेल्या दिवसांपर्यंत ठेवल्या जातात, मग पुसल्या जातात — त्या तारखेपूर्वी download करा. बिले व ग्रंथाचा सारांश कायम राहतो.